मध्ययुगातील ग्रंथालये ही सार्वजनिक ग्रंथालये नव्हती, कारण त्या काळात वाचक-वर्ग असा नव्हता.
इ.स. ११६२मध्ये लिऑन येथे बायबलची नक्कल प्रत सहा महिन्यात तयार करण्यात आली आणि सातव्या महिन्यात त्यावरील नक्षीकाम करण्यात आले. इ.स. १२२०-२१ मध्ये नोव्हारामध्ये नक्कलकाराने बायबलची नक्कल प्रत तयार करण्यास १५ महिने घेतले. नक्कल-प्रतीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेवटी परमेश्वराचे आभार मानले जात. हस्तलिखित प्रत तयार करणार्याच्या श्रमास प्रशंसनीय सेवा म्हणून मान्यता मिळाली.......